Saturday 22 October 2011

निर्मल नाही जीवन, काय करील निरमा साबण...?



हिस्सार च्या घटनेनंतर कोन्ग्रेस पक्षाचे नेते गंभीर झाले. निवडणुकीत आह्वान देणार्यांना कोन्ग्रेस वाले गांभीर्याने घेतात. अन्य क्षेत्रात त्यांच्यावर टीका केली तरी त्यांना बाधा होत नाही. हिस्सार चा पराभव मनाला लागल्यानंतर अण्णा टीमची जशी वॉर रूम आहे तशी कोन्ग्रेस ने देखील त्यांची वॉर रूम सुरु केलेली दिसते. कोन्ग्रेस ची रणनीती अण्णा टीम च्या रणनीती पेक्षा सध्यातरी वरचढ दिसते. त्या रणनीतीचा मुख्य गाभा हा आहे कि, अण्णा हजारेंना उपोषणाच्या धमक्या देण्यापासून रोखणे. शिताफीने कोन्ग्रेस ची एक टीम राळेगण टीम वर प्रयोग करीत होती. अण्णांना मौनाच्या गुहेत ढकलणे शक्य झाले. आता काही दिवस उपोषणाची घोषणा होणार नाही. या मिळवलेल्या शांततेच्या काळात अन्न टीम मधील एकेकाला एकटे गाठून हाताळायचे असा डावपेच दिसतोय. अण्णा टीम मधील इतर लोक उच्च्य व हाय फाय जगणारे आहेत. त्यांना क्यामेरासमोर चप्पल खाणे, मारहाण होणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे याची सवय नाही. ती बिचकतील अशी कोन्ग्रेस वाल्यांना आशा आहे. उदा. प्रशांत भूषण यांना एकदा मारलेली चप्पल प्रसार माध्यमांनी अहोरात्र दाखवली. देशातील लहान मुले म्हणू लागली कि, 'रोज प्रशांत भूषण यांना २०-२५ वेळा मारहाण होते.' या मंडळींनी प्रसारमाध्यमांचा अनुकूल भाग भोगला होता. त्यांना प्रसिद्धीची चातक लागली होती. आत्ता तीच प्रसार माध्यमे जेवा मारहाणीचे प्रदर्शन करतात तेंवा त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते. आपण जन आंदोलनाच्या फंदात पडलो नसतो तर आपल्यावर हि पाली आली नसती असेही त्यांना वाटत असेल. एक म्हण आहे, ' बोकेने घी देखा था, लेकीन बडगा नही देखा था' तसाच हा प्रकार झाला.

किरण बेदी यांचे दर्शन उपोषण पर्वाच्या काळात अखिल विश्वाला रात्रंदिवस होत होते. त्या पुढार्यांच्या नाकाला करू शकतात. त्यांनी गोपीनाथ मुंढेंची नक्कल केली. भारताचा राष्ट्रध्वज घुमावण्याची त्यांनी शैली हि आधुनिक होती. सर्व देशात लहान मुले टोपी घालून तिरंगा घुमवीत नाचतात. तिरंगा घुमाविण्याची त्यांची शैली अंगात आल्यासारखी होती. त्यामुळे त्यांच्या अंगात भारत मत येते असा समाज पसरला. त्या टी व्ही वर दिसल्या कि भोळीभाबडी जनता त्यांना नमस्कार करते. देवी अंगात आलेल्या बाईच्या लोक पाया पडतात. कारण तो नमस्कार त्या बाई ला नसतो तर बाई च्या अंगात प्रवेश केलेल्या देवीला असतो. साक्षात भारत मत किरण बेदी यांच्या शरीरात प्रवेश करते असा अंदाज त्यांच्या विशिष्ठ देहबोलीतून पसरला. अंगात आल्यानंतर सामान्य बाईच्या तोंडूनही सुभाषिते बाहेर पडतात. त्या म्हणल्या कि संसद आणि भारत राष्ट्रापेक्षा अण्णा मोठे आहेत. पराशाक्तीचा संचार झाल्यानंतर त्या व्यक्तीची शक्ती नॉर्मल राहत नाही. ती थोड्यावेले पुरती अचाट बनते. देव ऋषी अंगातली पराशक्ती काढण्यासाठी छडीचा मार देतो. अंगातले कसे उतरायचे या ज्ञानाचा कोन्ग्रेस पक्षाने किरण बेदीवर प्रयोग केला. त्या स्वत: भ्रष्ट आहेत असे ठरविण्यासाठी त्या खोटे हिशोब मांडतात हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. किरण बेदींच्या जीवाला वाईट वाटले. पण हा झटका बसल्यानंतर त्य अघोरी वाणीचा प्रयोग करणार नाहीत आणि बहुदा त्यांच्या अंगातही येणार नाही. यांचे म्हणणे असे होते कि मी होशोबातल्या लाबदीतून धापलेला पैसा सत्कर्मासाठी वापरते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अधिक गुंता गुंतीचे नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणतीही लबाडी सत्कर्मासाठी केली तर तिचे पुण्यात रुपांतर होते काय ? सत्कर्म कोणते ? हे कोण ठरविणार ? त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ज्यांना वाढवून आपला प्रवास खर्च सांगतात त्यांना किरण बेदी कल्पना देतात. म्हणजे हा उभयपक्षी मान्य असलेला घोटाळा आहे. मग प्रश्न निर्माण होतो कि, किरण बेदी त्या कंपनीला त्या प्रवासाची खोटी बिले देण्या एवजी सरळ देणगी का मागत नाहीत. किरण बेदींचा हा व्यवहार अनंत काळ पर्यंत जनतेपासून लपून राहिला असता. परंतु त्यांनी इतरांचा भ्रष्टाचार दाखविण्याच्या नादात अनेकांची अब्रू उघड केली, मग त्याच न्यायाने त्यांचीही अब्रू वेशीवर टांगण्यात आली. एक साधा नियम आहे, ज्यांच्या नाकातून शेंबूड वाहत असतो, त्याने दुसर्याचा नाकाच्या शेम्बडाकडे बोट दाखवू नये. हा मुद्धा स्पष्ट करण्यासठी मराठीत एक म्हण आहे, 'शेंबूड आपल्या नाकाला.... आपण पुसे दुसर्याच्या नाकाला'. किरण बेदी स्वत साठी आणि दुसर्यासाठी वेगवेगळे निकष का लावतात. याचे उत्तर असे आहे कि, वरचा (अभिजन) वर्ग नेहमीच स्वत: साठी सुगंधी शब्द वापरतो आणि सामान्य जनतेसाठी दुर्गंधी युक्त शब्द वापरतो. उदा. ब्राम्हण वर्गात प्रतिवर्षी एकत्र एवून जुने जानवे टाकून नवे जानवे परिधान करण्याची प्रथा आहे. या विधीला श्रावणी म्हणतात. श्रावणी काहींची नागपंचमीला असते किंवा नारळी पौर्णिमेला असते. श्रावणातला विधी म्हुणुन श्रावणी. या विधीच्या वेळी महत्वाचा कार्यक्रम म्हणजे संघटीत रित्या काही तीर्थाचे प्राशन करणे हा असतो. त्याला ब्राह्मणांच्या भाषेत 'पंचगव्य प्राशन करणे' असे म्हणतात. पंचगव्य म्हणजे दुध, दही, मध, गोमुत्र आणि शेन यांचे सम प्रमाणातील मिश्रण असते. दिवसभर श्रावणी मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या तोंडाला शेणाची दुर्गंधी येत असते. परंतु तो सांगत असतो कि मी सकाळी पंचगव्य प्राशन केले आहे. म्हणून शेन खाण्याच्या क्रियेला सभ्यता प्राप्त होते. हि संकृत कृती असावी असा आभास होतो. किरण बेदी यांना एकाच म्हणावेसे वाटते. ज्यांना दुसर्याचे दोष काढायचे असतात त्यांनी स्वत: अत्यंत शुद्द वर्तन ठेवायचे असतात. आता लोक त्यांना म्हणतात 'नाही निर्मल जीवन.. काय करील निरमा साबण !'

अण्णा हजारे हे राळेगण च्या गावगाड्यात तेथील पाटील बनले. हे अद्भुत घटना आहे. विलक्षण  घटना आहे. म्हाडा तालुक्यात गणेश कुलकर्णी पारंपारिक पाटील नसलेली व्यक्ती लोकप्रिय झाली आणि उपसरपंच झाली. तर स्थानिक पाटील लोकांनी त्याला तुकडे तुकडे करून मारून टाकले. अण्णा हजारे हे तर राळेगण मधील उपरे. हा कादंबरीचा विषय आहे, अगा जे घडलेची नव्हते, ते घडले! अण्णा वर गेले, देशात पोहचले, बराक ओबामा त्यांना ओळखू लागले, परंतु त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा गेल्या नाहीत. भारतीयांचे हेच वैशिष्ट्य आहे कि,  ते कितीही मोठ्या पदावर गेले तरी बालपणापासून बाळगलेल्या अंधश्रद्धा सोडायला तयार होत नाहीत. अण्णा टीम मध्ये नेमके दोष काय आहेत याचे वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करण्याएवजी त्यांनी वेगळाच निष्कर्ष काडला. नव्या जागेत वास्तू दोष आहे म्हणून त्यांनी पुन्हा आपला मुक्काम यादवबाबा मंदिरात हलवला. त्यामुळेच त्यांच्या टीमला दृष्ट लागली असे त्यांना सांगण्यात आले. अण्णा वाट्टेल ते करतील पण आत्मपरीक्षण कधीच करणार नाहीत. 

No comments:

Post a Comment