Monday 7 November 2011

देशको हिलाने वाला खुद न हिले !






अण्णा हजारे यांनी उभे केलेले आंदोलन सपशेल पराभूत व्हावे अशी काहींची इच्चा आहे. तसेच अण्णा हजारे यशस्वी होवोत वा अपयशी ठरोत, आगामी निवडणुकांमध्ये कोन्ग्रेस पक्ष पराभूत होऊन भाजप प्रणीत आघाधीचे सरकार केंद्रात यावे अशी तीव्र इच्छा असलेला एक वर्ग आहे. देशाची वैचारिक फाळणी झालेली आहे. या चर्चेत जन आंदोलन या कल्पनेपेक्षा अण्णा हजारे यांचे नेतृव, त्यांची क्षमता, बौद्धिक झेप, या गोष्टींना उगाचच प्राधान्य मिळाले आहे. सध्या देशासमोर खरा प्रश्न वेगळाच आहे. सर्व राजकीय पक्षांचा जन्म लोक्भावानेतून होतो. कोन्ग्रेस ने स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दीर्घकाळ अत्यंत दमदार पद्धतीने चालविला. स्वातंत्र्याच्या त्या चळवळी मधून लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि महात्मा गांधी अशी असंख्य गुणवान माणसे सार्वजनिक जीवनात आली. त्यांनी काही मुल्ये भारतीय जनमानसात रुजविली. प्रचलित परिस्थिती उलटी आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नव्याने भारती कशी होते, ते आपल्या पक्षाच्या उमेदवारी कोणाला देतात हे पहिले तर, सर्वच पक्षांना धनदांडगे लोक, गुन्हेगारी प्रवृतीचे लोक जवळचे वाटतात. नव्हे; एखादा गुन्हेगार आपल्या पक्षात यावा यासाठी चाधावोड चालते. सध्या सर्वात जास्त गुन्हेगारी मालमत्तेच्या खरेदी- विक्री व्यवहारात चालते. रियल एस्टेत हे या धंद्याचे नाव. एखादा मंत्री, खासदार- आमदार किंवा नगरसेवक जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत नसेल तर त्याचे नाव गिनीज बुकात घ्यावे लागेल. या परीस्थित परिवर्तन करण्याची शक्ती अण्णा हजारे प्रणीत आंदोलनात आहे काय ? हा खरा प्रश्न आहे.


अण्णा हजारे प्रणीत आंदोलन हे अस्सल जन आंदोलन होते कि ती जन आंदोलनाची आपल्या परीने केलेली नक्कल होती ? जन आंदोलनाचे भवितव्य ठरविताना काही वस्तू निष्ठ निकष आहेत. ते सर्व निकष थोड्या काळापुरते बाजूला ठेवूया. फक्त एकाच निकष लक्षात घेऊ .... जन आंदोलन हे राष्ट्र बांधणीचे मध्यम आहे यावर हे आंदोलन चालविणाऱ्या नेतृत्वाची ठाम श्रद्धा आहे का ..? हा निकष अत्यंत महत्वाचा आहे.



राष्ट्र उभारणीसाठी 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' याला पर्याय नाही. डावी कडे झुकलेला म्हणजे नाहीरे वर्गाविषयी संवेदनशील असलेला मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे 'आंदोलनामुळे राष्ट्रात कोणत्याही दोन गटात वैरभाव, द्वेष भावना वाढणार नाही याची काळजी घेणे. म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारी टीम अण्णा किंवा स्वतः अण्णा यांच्यासाठी एकाच वस्तुनिष्ठ निकष आहे कि त्यांच्यामध्ये कोणाविषयी द्वेष, वैरभाव आहे का याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. एक नक्की आहे, टीम अण्णा मध्ये आपापसात स्नेह भाव, बंधुत्वाची भावना फुललेली दिसत नाही. परिस्थितीने त्यांना इतिहासाने एका विशिष्ठ ठिकाणी एकत्र आणून कोंडले असावे असे दिसते. अण्णा हजारे यांचा अहंकार फुग्याप्रमाणे सातत्याने फुगतोच आहे. याचे नेमके कारण काळात नाही. अहंकारामुळे हे घडू शकते, वा अज्ञानामुळे हे घडू शकते किंवा कुसंगतीने हि घडू शकते. अण्णांच्या व्यक्तीमत्वात जे गुण दोष आहेत. त्याचा शोध घेण्याचे एरवी काहीच कारण नाही पण ते ज्या उंचीवर पोहचले आहेत तेथे त्यांचे दोष मोठ्याप्रमाणावर वाढतील कि आत्म परीक्षणाच्या माध्यमातून अण्णा स्वत चे मन दोष मुक्त करू शकतील असा हा पेच आहे. पूर्वेतिहास पाहता अण्णांना सत्संगाचे वावडे असावे असा निष्कर्ष काढण्याइतका भक्कम पुरावा आहे. एखाद्याने संसार केला नाही म्हणजे केवळ त्याच निकषावर तो माणूस उत्तुंग व्यक्तिमत्वाचा व सद्गुणांचा पुतळा होतो काय ? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकाने संसार करावा ही जनरीत आहे. कुटुंब सांभाळण्याच्या प्रयोगातून माणसाला अनेक गोष्टींचे भान येण्याची शक्यता असते. सर्वांना सांभाळून घ्यावे असा विचार कुटुंब प्रमुखामध्ये रुजतो. संसार न केलेल्या माणसाला संसार करणारी माणसे गौण दर्जाची वाटत असतील तर तो त्यांचे नेतृव्त कसे करू शकणार. डॉ. राम मनोहर लोहिया हे अहिंसक जन आंदोलनाचे कृतीशील विचारवंत होते. 'कोन्ग्रेस विरोध' त्यांच्या रोमारोमात भिनला होता. ढोंगाचा व ढोंगी माणसांचा ते सदैव तीव्र निषेध करीत. त्यांच्या प्रयत्नामुळे कोन्ग्रेस ने ९ राज्यात सत्ता गमावली. याच लोहियांनी आयुष्याच्या अखेरीस जय प्रकाश नारायण यांना एक पत्र लिहिले होते. "प्रिय साथी जय प्रकाश, मी देशाचा नेता बनू शकत नाही. हा देश बिगर संसारी व ब्रह्मचारी माणसाला कधीच आपला नेता मानणार नाही हे माझ्या लक्षात आले नाही. अलीकडे मलाही ते पटू लागले आहे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी न घेतल्याने मनात अनेक कंगोरे निर्माण होतात. म्हणून मित्र तूच या देशाचा नेता होऊ शकतोस. परिस्थिती गंभीर आहे, देशाला हलविणाऱ्या नेत्याची गरज आहे, आणि तो नेता तू आहेस. देश को तुम हि हिला सकते हो.. सिर्फ एक शर्त है.. लेकीन हिलाने वाला खुद नही हिले !" आज डॉ. लोहिया असते तर ते अण्णा हजारेंना म्हणाले असते कि 'अण्णा आपल्या भुमिके पासून सारखे बदलू नका. स्वत चे मन स्थिर असल्याशिवाय देशाला हलविण्याच्या भानगडीत पडू नका.

No comments:

Post a Comment