माझा परिचय

संपुर्ण नाव:डॉ. कुमार गणेश सप्तर्षी
जन्म दिनांक:२१ ऑगस्ट १९४१
घरचा पत्ता:प्रबोधन को ऑपरेटिव हौसिंग सोसायटी,
६१-अ /,एरंडवणा, पुणे-४११००४
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२५४३१७२९)
कार्यालयीन पत्ता:’क्रांतिनिकेतन’ १४६८ सदाशिव पेठ खजिना विहिर चौक,
एस. पी. क़ॉलेजसमोर, पुणे-४११०३०
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४६१४०९)
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४७५८६६)
शिक्षण:बी. एस्सी. (एस. पी. क़ॉलेज)
एम.बी.बी.स. (बी.जे. मेडिकल क़ॉलेज पुणे)
प्रथम वर्ष (एल.एल.बी)
व्यवसाय:पुर्ण वेळ सामाजीक कार्यकर्ता
संघटनात्मक कार्य:(अ) १९६७- जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम ता. नवादा जि. गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदतकेंद्र चालवले.
(आ) कोयना भुकंपग्रस्ताना मदतकार्य.
(इ) नोव्हें.१९६७ मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना.
(ई) १० मे ते १५ मे १९६८ श्री. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात १५०० तरुणांची १५ दिवसांची ‘श्रम संस्कार छावणी’ संघटीत केली.
(उ) आणीबाणी पहिले ३ महिने भुमीगत कार्य, २ ऑक्टोबर १९७५ पासुन २६ जानेवारी १९७७ पर्यंत येरवडा कारागृहात मिसा स्थानबद्ध.
(ऊ) १५ ऑगस्ट २००१ युवक क्रांती दलाची पुन:स्थापना अध्यक्ष म्हणुन कार्यरत.


संसदिय सहभाग:
 ९ ऑगस्ट १९७७ रोजी मा. चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षात प्रवेश/ जनता पक्षातर्फे १९७८ साली अहमदनगर शहरातुन आमदार

ग्रामीण भागातील कार्य
(अ)डिसेंबर १९६९ मध्ये सुरु केलेला पुण्यातील दवाखाना १९७४ साली बंद करुन ‘राशीन कम्युन’ मध्ये आणीबाणी जाहीर होईपर्यंत मुक्काम – रोज पदयात्रा.

(आ)अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील खेडनगर येथे १९८० ते १९८५ मुक्काम : भारतीय समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त म्हणुन कार्य २६ एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्र स्थापन करुन शेती, नर्सरी, लिंबोळी तेल वाटप, ससापालन गोपालन, संकरीत शेळीपालन, मत्स्यशेती, वनशेती इ. प्रयोग.

(इ) १९८४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण विदयालयाची स्थापना इ. ५वी ते १२वीचे वर्ग, सध्या विद्यार्थीसंख्या १०००. जुन २००१ पासुन महाविद्यालय सुरु.

ग्रंथसंपदा
संकल्प
यात्री(२ आवृती)
’स्वप्नांच्या सापळ्यांचा देश: अमेरीका’
‘येरवडा विद्यापीठातील दिवस’

संपादन/प्रकाशन
२६ जानेवारी १९९२ पासुन सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादन/प्रकाशन

प्रवास
हिमालय भ्रमण(१९६५)

मार्च ते जून १९८४ चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली भारत यात्रेत सामील

केरळ(१९६८), तामिळनाडु(१९६९), गुजराथ(१९७४), बिहार(१९६७, १९७४), बंगाल (१९७७), नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपुर(१९८४) या भागात मुक्काम ठोकुन तेथील समाजाचा अभ्यास

१९८० साली इस्त्राइलचा व युरोप खंडाचा प्रवास

आंदोलन सुची

डिसें १९६७ पकिस्तानला कच्छचे रण दिले, त्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधाचे आंदोलन पुणे शहरात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा

जुलै १९६८ पुण्यातील महाविद्यालयानी केलेल्या फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उपोषण यशस्वी

जुलै १९७१ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -कुलगुरु हटाओ आंदोलन पुणे, धुळे, कोल्हापुर, मुंबई येथे ही यशस्वी

जून १९७२ सोलापुर मेडिकल क़ॉलेज कॅपीटीशन फी विरोधी आंदोलन – दमाणी हटाव शहरातील विविध जनविभाग आणि जिल्ह्यातील विविध जनविभाग सामील– महाराष्ट्र सरकारने कुमार सप्तर्षी यांच्या विरोधात प्रथम मिसाचा वापर केला -यशस्वी

ऑगस्ट १९७२ लातुर येथील गोळीबार व संचारबंदी याविरुद्ध आंदोलन गोळीबार होउनही कर्फ्युत सामान्य जनतेचा सहभाग -यशस्वीमार्च १९७३ पुरीच्या शंकराचार्यांच्या विरोधात जाहीर वादविवाद देशभर पडसाद

जुन १९७३ व १९७८ आयुर्वेद क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी

जुलै १९७३ बी. एड. क़ॉलेज विद्यार्थ्यांचे आंदोलन मालेगाव (नाशिक) यशस्वी

डिसेंबर १९७३ आघाव ट्रेनिंग क़ॉलेज धुळे विद्यार्थी आंदोलन यशस्वी

जाने १९७४ दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृतीत वाढ- अखील भारतीय पातळीवरील आंदोलन- औरंगाबाद प्रमुख केंद्र यशस्वी

जुन १९७४ मराठवाडा विकास आंदोलन य़ुक्रांद संघटनेच्या नेतृत्वाखाली

डिसें १९७४ ते जुन १९७५ राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर येथील राशीन कम्युन च्या प्रयोगाचे आंदोलन ग्रामीण परिवर्तनासाठी नव्या कार्यपध्दतीचा शोध यशस्वी

मे १९७७ शेडगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलिताना प्रवेश मिळवुन देण्याचे आंदोलन यशस्वी

ऑगस्ट १९८२ नामांतर आंदोलन सर्वांबरोबर कारावास

नोव्हें १९८३ म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरु हटाव आंदोलन ( कुलगुरु दत्ताजीराव साळुंखे) यशस्वी

या यादीत फक्त महत्वाची आंदोलने नमुद केली आहेत. विविध आंदोलनात मिळुन डॉ. कुमार सप्तर्षी याना एकुण 35 वेळा अटक झाली आहे.