Wednesday 16 January 2013

तालिबानी वृत्ती डोके वर काढतेय ..!





स्वामी विवेकानंद यांची  १५० वी जयंती. १२ जानेवारी पासून त्याचा उत्सव सुरु झाला. स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मला परम आदर आहे. अगदी कमी वयात त्यांनी धर्माचे, अध्यात्माचे व देशातील तत्कालीन परिस्थितीचे योग्य मुल्य मापन केले. त्यांचे एक बंधू क्रांतिकारक होते. घरात शिक्षणाची प्रराम्पारा होती. त्यांची आई म्हणत असे कि, " माझी तिन्ही मुले मी देशाला अर्पण केली आहेत." स्वामींचे आयुष्य अवघे ३९ वर्षाचे, ते संन्याशी होते व भगवे कपडे परिधान करीत. एवढ्या एका कारणाखातर हिंदू तालिबानी डोके वर काढत आहेत. पुण्यात त्यांनी फलक लावून स्वामीजींच्या तोंडी भलतीच वाक्ये घातली आहेत. उदा. विवेकानंद म्हणतात कि, "खबरदार ! हिंदू धर्माला नवे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल." या फ्लेक्स वर ज्यांची नावे आहेत त्यांची पुण्याला चांगलीच ओळख आहे. 


वास्तविक स्वामी विवेकानंद यांनी अतिशय क्रांतिकारक विचार मांडले आहेत. त्यांनी सर्व धर्मांचे परिशीलन करून नवा वैश्विक धर्म सांगितला आहे. त्यावेळची परिस्थिती बघून त्यांच्या मनाला क्लेश होत. अस्वछ्चता, दारिद्र्य  आणि अस्पृश्यता पाहून ते व्यथित मनाने म्हणाले कि,  किंमत वरच्या वर्गाला द्यावी लागेल भारतात भावी काळात शूद्रांचे राज्य येईल. "आजचा हिंदू धर्म हा धर्म नह्वे, हा तर सैतानाचा बाजार आहे !" त्यांनी परीज्रावक म्हणजे संन्याशी बनून संपूर्ण भारतभर भ्रमण केले. समाजपुरुषाचे जवळून दर्शन घेतले. भारतमाता हा त्यांना सुचलेला व त्यांनी प्रचार करून समाजात रुजलेला शब्द आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची नवीन मांडणी केली. त्यांचा जन्म १८६३ सालचा. त्यापूर्वी १८५७ चा अयशस्वी उठाव फक्त ६ वर्षे आधी झाला होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंद यांच्या पेक्षा ७  मोठे होते, तर गांधीजी ६ वर्षांनी लहान होते. पुण्यातील विंचूरकर वाड्यात लो. टिळक राहत असताना स्वामीजी त्यांच्या घरी पाहुणे म्हणून ८  दिवस राहिले होते. कदाचित विवेकानंद यांच्याकडूनच राष्ट्रवादाची नवीन मांडणी टिळकांपर्यंत पोहचली असावी. टिळक त्यावेळी फक्त ३६ वर्षांचे तरुण होते. पुढे २४ डिसेंबर १९०१  रोजी कलकत्यात अ. भा. कोन्ग्रेस च्या बैठकीला गेले असता टिळकांनी मुद्दामहून बेलूर आश्रमात जावून विवेकानंदांची भेट घेतली. त्यावेळी १० -११ वर्षांपूर्वी आपल्या घरी राहून गेलेला अनामिक संन्याशी तो हाच हे टिळकांच्या लक्षात आले. "कोन्ग्रेस चे काम सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे. तो देशाचा कणा आहे" असा विचार विवेकानंदांनी लोक्माण्यांकडे मांडला होता. विवेकानंदांचे विचार टिळकांकडून गाधींकडे संक्रमित झाले असावेत. सर्व जाती धर्मांना एकत्र बांधणाऱ्या राष्ट्रवादाची मांडणी गांधीजीनी केली, त्याचे बीज विवेकानंदांच्या चिंतनातून प्रकट झाले होते.  काही असो, स्वामी विवेकानंद  कट्टर हिंदुत्ववादापासून शेकडो योजने दूर होते. 

 श्री. हेमंत  देसाई  यांनी दै. सकाळच्या  सप्तरंग पुरवणीत (रविवार, दि. १३ जाने २०१३)  लेख लिहिला. "न बोलण्याचे काय घ्याल " वास्तविक हा लेख हिंदू व मुस्लिम नेत्यांच्या चुकीच्या विधानांवर अत्यंत समतोल असा लेख आहे. तथापि हिंदुत्ववाद्यांनी तो लेख म्हणजे रा. स्व. संघावर हल्ला आहे असा समाज करून घेतला. रविवार पासून रोज त्यांना धमक्या देणारे फोन, मेसेज व इमेल यांचा मारा चालू आहे. शिवीगाळ, धमक्या देणे म्हणजे हिंदू धर्म नह्वे. हि तर खऱ्या हिंदू धर्माची बदनामी आहे. आम्ही हिंदूंच्या बाजूचे पण हिंदुत्वाच्या विरोधातील लोक हेमंत देसाई यांच्या बरोबर सख्खे नाते जाहीर करतो आम्ही सारे त्यांच्या बरोबर  आहोत. ना. आर आर पाटील यांनी पोलिसांना सूचना देवून फोन कंपनी कडून सर्व मेसेज, फोन व इमेल यांचे तपशील मागून घ्यावेत व त्यांचा मुल स्त्रोत शोधावा.  त्यानंतर कायदेशीरपणे या लोकांवर गुन्हे नोंदवावेत अशी आम्ही जाहीर मागणी करीत आहोत. तालिबानी हा शब्द मुस्लिम अतिरेक्यांसाठी असला तरी, अभिव्यक्ती  स्वातंत्र्याची गळचेपी करणारे ते तालिबानी असे समीकरण सर्व भाषांमध्ये रूढ झाले आहे. लोकशाही प्रणाली आणि तालिबानी प्रवृत्ती या दोन गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात राहू शकत नाहीत. 

2 comments:

  1. स्वामी विवेकानंद व टिळक यांच्याविषयी आपण वर जे लिहिले आहे ते बरोबर आहे याची आपल्याला खात्री आहे काय? आपल्याला विनंती अशी की अजून थोडा अभ्यास करून, वरील मजकूर तारखा घालून तपासून पाहावा.

    ReplyDelete
  2. हिंदुना तालिबानी म्हणण्यात कोणत धाडस? आपला देश जगात soft nation म्हणून परिचित आहे,ते कुणामुळ? अर्थात ज्यांनी आपल्याकडे डोळसपणे पाहिले त्यांना .. जरा मुसलमानांना एकदा तालिबानी म्हणून बघा बर! अल्लाउद्दिन खिलजी पासून अफजल खान ,अब्दाली हे जे लादेन चे बाप होते त्यांच्या बद्दल आपण काहीच नाही का बोलणार? मी एक atheist अन तटस्थ म्हणून माझ्याकडे पाहिलं जान अशक्य आहे हे मला माहिती आहे, विशेषतः हिंदू हा शब्द तोंडून निघता क्षणी ..

    ReplyDelete