Sunday 16 October 2011

नियतीचा खेळ: अण्णा- अडवाणी- केजरीवाल-येडीयुरप्पा




नियती म्हणजे अद्भुत गोष्ट असते असा आपला समज आहे. खरे म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याच्या बाहेर "नियती नावाची वेगळी शक्ती असते असे मानायचे कारण नाही. नियतीचे नियंत्रण व्यक्तीच्या हातात नसते एवढे मात्र खरे. पण नियती हि दैवी व अमानवी शक्ती आहे असे ठाम पाने म्हणता येणार नाही. मनुष्य रोज जी कृत्ये करतो त्यातील सारांश शिल्लक राहतो. या शिल्लक राहिलेल्या सारांशातून नियती नावाची एक अदृश्य शक्ती निर्माण होते असे म्हणावे लागेल. माणूस सत्कृते करत जातो आणि त्यांचा सारांश म्हणून त्याच्या पाठीमागे इतरांची सद्भावना व सदिच्च्या निर्माण होते. त्याने दुसर्यांना क्लेशदायक कृत्ते केली तर त्याच्या मागे व भोवती दुर्भावना पसरते. सद्भावना किंवा गुडविल यांचा संचय (यालाच काही लोक पुण्य म्हणतात ) बर्यापैकी असला त्या व्यक्तीविषयी लोक चांगले बोलतात. त्याच्याविषयीची सद्भावना गुणाकारी पद्धतीने वाढते. त्यामुळे त्याची अवघड कामे सहज यशस्वी होतात. यालाच आपण नशिबाची व नियतीची साथ असे म्हणतो. त्या व्यक्तीविषयी लोक वाईट बोलत असतील तर त्याच्या कामात त्याला पूर्व कल्पना नसलेले अनेक अडथळे येतात. याला फुटके नशीब म्हणतात. पण एक नक्की कि आयुष्यात केलेल्या कृत्यांवरूनच सकारात्मक वा नकारात्मक नियती तयार होते. नियतीवर व्यक्तीचे नयंत्रण मात्र राहत नाही. 

सध्या भाजप व अण्णा टीम यांच्या बाजूने नियती काम करीत नाही असे दिसते. लालकृष्ण अडवाणी यांनी वृद्धापकाळात देखील संकल्प शक्तीच्या आधाराने, पंतप्रधान होण्यासाठी शेवटची संधी म्हणून मोठ्या उमेदीने रथयात्रा सुरु केली. त्यांचे पूर्व कृत्य पाहता धर्मद्वेष वाढविण्यासाठीच त्याच्या रथयात्रेला यश मिळाले होते. धर्म द्वेषामुळे देशाचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले; पण भाजपला केंद्र सरकारची सत्ता मिळाली. हि नियती आत्ता अडवानिन्च्याही हातात नाही. त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन चेतना असा बोजड संकृत शब्द वापरला पण नियतीने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नाचा घास घेतला. भाजपचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. अडवाणींची रथयात्रा भव्यपणे पंचर झाली. आता लोक म्हणताहेत, 'अडवाणीजी प्रथम तुमचे घर सुधारा. भाजपला भ्रष्टाचार मुक्त करा. त्यात तुम्हाला यश आले तर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भारत देश आम्ही तुमच्या हातात सोपवू. जमल्यास तुम्हाला पंतप्रधान करू. तुमची नियती व नशीब जे असेल ते घडेल. रथयात्रा मात्र थांबवा. पंचर झालेला रथ पाहून आमच्या मनात कसलीही चेतना निर्माण होत नाही. तुमची यात्रा कॉमेडी एक्स्प्रेस झाली आहे.' 

नरेंद्र मोदींची नियती पहा. गुजरात मध्ये त्यांच्या हातून घडलेला नरसंहार आणि त्यातून शेष उरलेला सारांश हा दुर्भावानेचा आहे. त्यांनी ढोल बडवीत काही तासांचे उपोषण केले. कुंभमेळ्या प्रमाणे उपवास मेळा घेतला. पण मागील कृत्यातून निर्माण झालेली नियती एका मौलानाच्या रूपाने समोर आली आणि मुसलमान ढंगाची टोपी घालण्याचा आग्रह करू लागली. नरेंद्र मोदी तर असे दाखवीत होते कि त्यांना मुसलमाना इतके जगात अन्य काहीही प्रिय नाही. नियतीने घात केला, भव्य ढोंगाचा छेद झाला आणि नाटकाचा ANTI CLIMAX झाला. 

अण्णा टीम मध्ये फक्त कोन्ग्रेस विरोधी हे तत्वज्ञान मानाण्यावरून मतभेद झाले. हिस्सार मध्ये अण्णा स्पष्टपणे कोन्ग्रेस विरोधात गेले होते. भाजपचा उमेदवार भ्रष्ट असला तरी त्याला मत द्या असाच त्यांचा पवित्रा दिसून येत होता. परंतु अण्णा टीम संतोष हेगडे यांनी या विषयी जाहीर रित्या मतभेत उघड केले. प्रशांत भूषण यांना श्रीराम सेनेने मारहाण केली. श्रीराम सेनेची भूमिका व विचारधारा पूर्णता: हिंदुत्व वाद्यांशी जुळणारी आहे. श्रीराम सेनेची हिंसेवर श्रद्धा आहे. अण्णांची अहिंसेवर श्रद्धा नाही, त्यांना डावपेच म्हणून अहिंसा मान्य आहे. म्हणून ते महात्मा गांधी शहीद भगत सिंग असे कॉकटेल तत्वज्ञान मांडत असतात. अण्णा हजारे खूपच धाडसी आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलण्यासाठी ब्लॉग सुरु केला आहे, माईक वरून जो आवाज पोहचतो तो कर्ण्याने (भोंग्याने) मोठा करणे ठीक आहे. परंतु कधी कधी माईक च्या ऐवजी कर्णेच (भोन्गेच) बोलू लागतात. अण्णांनी गाधीवादात  दुरुस्ती करण्याचेही धाडसही केले, त्याक्षणी मी मनातल्या मनात अण्णांचे पाय धरले. (तसा मी कोणा सम वयास्काच्या पायावर माथा टेकवत नाही) अण्णा प्रती गांधी होणार बनणार अशी चिन्हे होती; पण आत्ता तर ते 'सुपर गांधी' होत आहेत. ते म्हणाले 'म. गांधींच्या काळात शाब्दिक हिंसा देखील वर्ज्य होती. परंतु आता काळ बदलला आहे. म्हणून मी शाब्दिक हिंसेला मान्यता देतो. कुणाला पिडा देणारे कठोर शब्द वापरणे म्हणजे हिंसा असे जुन्या काळातले बापुजी म्हणत. सुपर गांधी म्हणत आहेत कि, 'शाब्दिक हिंसा केली पाहिजे. मी दोन वेळा मनीष तिवारीचे ऐकले. तिसर्या वेळेला मी त्याला वेड्याच्या दवाखान्यात पाठवावे अशी टीका केली.' शाब्दिक हिंसा हि सत्याग्रह शाश्त्रामध्ये अण्णांनी केलेली दुरुस्ती आहे. याला मी धाडस म्हणतो. अण्णा टीम फुटणारच. कारण ती अण्णांची पूर्व कृत्यांमधून तयार झालेली नियती आहे. असे घडू नये अशी आमच्या सारख्या अनेकांची इच्छया आहे पण नियतीपुढे आपण काय करणार.....! आता अण्णांनी नियतीचे चक्र थांबविण्यासाठी बेमुदत मौन नावाचे हत्त्यार उपसले आहे. मौन हे आत्मशुद्धी साठी असते. असे म. गांधींनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे अण्णांनी गांधींच्या विचारधारेत केलेल्या दुरुस्त्या ते काढून टाकतील अशी अशा निर्माण झाली आहे. आत्म शुद्धी झाल्यावरच शुद्ध गांधीवाद उमगतो. 

...............अरविंद केजरीवाल ! हे गृहस्त आकाशायेवढे झाले आहेत. मराठीत तुकारामांचा अभंग आहे, 'तुका झाला आकाशाएवढा'. त्याचा अर्थ तुकारामाने आपले मन आकाशायेवढे मोठे केले असा होतो. केजरीवाल यांचा अहंकार आकाशाएवढा झाला होता. या तुकाराम आणि त्यांच्यात फरक आहे. केजरीवाल म्हणाले आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. आम्ही निवडणुकीच्या काळात प्रचार दौरा करणार नाही. आमची बांधिलकी फक्त लोकपाल बिलाला आहे.' अण्णा नावाचा माणूस हाती लागल्यापासून केजरीवाल यांना अल्लाउद्दिन चा दिवा गवसल्यासारखे वाटत होते. हा आधुनिक काळातला अल्लाउद्दिन केंव्हाही अण्णा रुपी दिवा घासायचा आणि त्यातून महाकाय शक्तीचा..... निर्माण करायचा. असो .. अल्लाउद्दिन ला देखील त्याच्या कृत्यातून निर्माण झालेली नियती माफ करीत नसते.

एकाच वेळी येडीयुरप्पा अटकेत, अडवाणींची रथयात्रा पंचर, अण्णा टीम मध्ये मतभेद, केजरीवाल लघु होणे आणि अण्णांचे मौन या सार्या गोष्टी नियतीने एकाच माळेत गोवल्या आहेत. 

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Last time Mr.Advani's Rath-Yatra was stopped in Bihar, so this time he started it from Bihar that also in presence of Bihar CM. Regarding Mr.Kejariwal and Anna's speeches it is very evident that they have started feeling that they are above the parliament and constitution that is why they want a law to be drafted overnight as per their whim. The support they are getting is mostly contributed by the BJP & Sangh Parivar. It is not India's voice. If they think that they can dislodge the congress government can give and rule the country, then they are in fool's paradise. In Abraham Lincoln's words," No one can fool all the people all time."

    ReplyDelete
  3. Dr Saheb, You have not commented on what Prashant Bhushan had said on Kashmir. His views are opposite to that of Anna Hazare. May be most Indians disagree with Mr Prashant Bhushan.But even the interlocutors appointed by the GOI has recommended some autonomy to the Valley. There must be a debate regarding the future of Kashmir and this problem must be solved so that peace and friendship can be established between India and Pakistan.

    ReplyDelete
  4. Surely, Kashmir issue needs to be addressed at the earliest. We have committed historical mistake by taking the issue to UN. And above all, no one will leave peacefully where there is 1 army personnel for every 3 civilians. It is more pathetic than even the Gaza strip. And if we boast that it is our integral part then right from the beginning we should not have granted Kashmir a special status keeping it out of ambit of Indian Constitution. Also there is time to rethink about the importance of Himalayan ranges in defence perspective. In the era of inter-continental ballistic missile loaded with nukes and also country like China having capacity to go for war from space, the traditional importance of these ranges doesn't hold true. Also what we saw in 26/11 in Mumbai was an eye opener in considering seas as a safe boundary for our country. Rather than fighting with the neighbours and also the people in disputed areas, we can think better options which will give us opportunity to leave peacefully and utilizing our resources for development.

    ReplyDelete