Tuesday 29 November 2011

व्यापारी विरुद्ध भारत देश :

व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.

भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 

अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 

Thursday 24 November 2011

शरद पवारांवरील हल्ला: समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे काय?

शरद पवार यांना हरविंदर सिंग नावाच्या तरुणाने बेसावध अवस्थेत गाठून मारहाण केली. एकदा लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला कि किमान सभ्यपणा अपेक्षित आहे. हा प्रकार असभ्य व रानटी आहे. शरद पवार त्यावेळी सावध असते तर त्या तरुणाने हल्ला करण्याचे धाडस केले नसते. म्हणून हा भ्याड हल्ला आहे. याच तरुणाने सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता. मानसशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक घटनांची अशी वैयक्तिक प्रतिक्रिया संभवत नाही. कदाचित या माणसाच्या मागे काही षडयंत्र रचणारी माणसे असू शकतात. मी प्रकारचा तीव्र निषेध करतो. कालच प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर बोलताना मी म्हणालो होतो कि, 'दारू सोडण्यासाठी बदडून काढणे आणि पुन्हा नाकावर टिच्चून सांगणे कि ३० वर्षापूर्वी मी ज्यांना बदडले ते आज माझे उपकार मानतात. अन्यथा माझ्या आयुष्याचे वाट्टोळे झाले असते असे ते मला सांगतात' हे अण्णा हजारे यांनी सांगणे गैर आहे. परत अण्णा असे म्हणतात कि, 'मी मातृभावानेने लोकांना बदडत होतो.' अशी भूमिका असणार्यांना प्रतीगांधी हि मान्यता मिळावी हे देशाचे दुर्दैव आहे. हेच अण्णा हजारे शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतांना फारच कुत्सित बोलले. ते असे म्हणाले कि, 'एकाच थप्पड मारली का?' म्हणजे अधिक थपडा मारायला पाहिजे होत्या अशी त्यांची अपेक्षा होती असे दिसते. 

काल मी अंदाज व्यक्त केला होता कि, जे दारूचे व्यसन सोडण्यासाठी मद्य प्रश्न करणाऱ्यांना बदडून काढण्याचा विचार मांडतात त्यांच्या मनात भ्रष्टाचारी माणसांना बदडून काढावे असाही विचार मूळ धरू लागेल. मग बदडून काढण्याची लाट येईल. मग हुकुमशाही व गुंड प्रवृत्तीचे म्हणू लागतील कि "तो अमुक आमुक दारुड्या होता किंवा भ्रष्टाचारी होता म्हणून आम्ही त्यांना बदडून काढले" हि भूमिका मुळातच विकृत आहे. 

शरद पवार हे माझे ५१ -५२ वर्षापासुनचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय घटनेपेक्षा आपल्या मित्राला अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वाईट वाटले. विशेषता त्यांच्या आजाराच्या जागेवर आघात करण्यात आला. हे तर फारच गंभीर आहे. आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असलो तरी आमच्या वैयक्तिक आपुलकी मध्ये अंतर पडलेले नाही. ७  वर्षांपूर्वी माझ्या घरावर, मी घरी नसताना बुरखाधारी सशत्र तरुणांनी जबरदस्तीने घरातल्या फर्निचर ची मोडतोड केली. माझ्या मुलाच्या शरीराला चाकू लावून हि राडेबाजी त्यांनी केली होती. त्या प्रसंगानंतर शरद पवारांचा फोन आला होता. मुख्यमंत्री सुशीलकुमार आणि छगन भुजबळ भेट द्यायला आहे होते. दीड वर्ष महाराष्ट्र सरकार तर्फे दोन सशत्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरावर राजकीय भूमिकेखातर हल्ले होतात आणि शासन संरक्षणही देते. शरद पवार हे माझ्या तुलनेने महान राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा प्रकार फारच गंभीर वाटतो. कुणीतरी, कोणालातरी सार्वजनिक जीवनातून बाहेर फेकण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा भास होतो. 

१९७८ साली शरद पवार पुलोद आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी जनता पक्षाचा आमदार होतो. आमचे राजकीय मेतकुट जमले होते. शरद पवारांनी कोन्ग्रेस व वसंत दादांशी गद्दारी केल्याचा राग इंदिरा कोन्ग्रेस च्या लोकांना आला होतो. कोन्ग्रेस चे भंडारा जिल्ह्यातील एक आमदार सुभाष कारेमोरे यांनी विधान सभेचे कामकाज चालू असताना 'गद्दार.. गद्दार ..' अशा घोषणा देवून शरद पवारांना चप्पल फेकून मारली होती. त्या प्रसंगाचा आम्ही सर्वांनी निषेध केला होता. मला वैयक्तिक दुख: झाले होते. त्या प्रसंगात शरद पवार त्यांची मनशांती ढळलेली नाही असे दाखवत होते. तथापि वरून तसे दाखवत असले तरी त्यांना अंतकरणात जखम झालेली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागले कि, साहजिकच कोणाच्याही मनात विचार येतो कि आपण समाजकार्य का करावे? आपण एका व्यक्तीला नकोसे झाले आहोत कि संपूर्ण समाजाला नकोसे झालो आहोत असा मनात संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी शरद पवार यांचे वय ३८ वर्षांचे होते. आज ते ७२ वर्षाचे आहे. भारतीय संस्कृतीत वयोजेष्ठतेला अपार महत्व आहे. मग सुखराम यांच्या सारख्या ८० वर्षाच्या नेत्याला मारहाण का झाली? समाजाची संस्कृती अवनत होत चालली आहे काय? असे अनंत प्रश्नाचे भोवरे मनात तयार होतात. कदाचित भविष्यकाळात जेष्ठ पुढार्यांना मारहाण करून नाउमेद व निरुत्साही करणे अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता आहे. म. गांधी यांच्या सारख्या ७९ वर्षाच्या वृद्ध माणसाला गोळ्या घालण्यात फार मोठे शोर्य होते असे मानणारे नथुराम वादी मंडळी अजूनही समाजात आहेत. सुखराम यांना ज्यावेळी तरुणाने मारले त्यावेळी येवढा निषेध झाला नाही. म्हणून त्याने पुन्हा शरद पवारांना मारून प्रसिद्धी मिळवली. या प्रकारची चटक विविध पक्षातील तरुणांना नक्की लागेल. तुरुनांच्या वयोगटाला वाह्यात नेते प्रियच असतात. असेच एक वाह्यात नेते राज ठाकरे म्हणाले कि, 'शरद पवारांना कशाला मारले' शरद पवार मराठी आहेत म्हणून राज ठाकरेंना आदरणीय वाटतात. ते पुढे म्हणाले कि. 'पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मारायला हवे होते.' इंदिरा कोन्ग्रेस चे लोक उद्या राज ठाकरे यांना मारण्यासाठी बक्षीस लावतील. हा खेळ चालू करून या देशाचे वाट्टोळे करण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला दिसतो. 

राष्ट्रवादी कोन्ग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजीचे बजीचे नाटक सुरु केले आहे. कारण सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणीचा मोसम सुरु आहे. साहेबांवरील हल्ल्यामुळे त्यांना झळकून घेण्याची, निष्ठेचे प्रदर्शन करण्याची ऐतीच नामी संधी प्राप्त झाली आहे. आर आर पाटील यांना तर मोठ्या व छोट्या या दोन्ही साहेबाना निष्टा दाखविण्यासाठी पोलिसांना निष्क्रिय राहण्याचा आदेश दिला आहे असे दिसते. नेमका असाच आदेश नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगली मध्ये दिला होता "... तीन दिवस निष्क्रिय राहा..!' तसाच हा प्रकार आहे. पोलिसांची निष्क्रियता पाहून अनेक भ्याड लोकांना शौर्य दाखविण्याची उबळ आलेली दिसली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचा निषेध करणार कोणावर दगड फेकणार आणि कोणाच्या गोष्टी जाळणार. दिल्ली मध्ये केंद्र सरकार मध्ये आणि महाराष्ट्रातही ते सत्तेत आहेत. रस्ता रोको हा प्रकार शासनाच्या विरोधासाठी करतात. बस जळतात ते हि शासनाच्या निषेधासाठी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त उपोषण करून सुताकामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आहे. रस्त्यावर येवून जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नुकसान करतील त्याची भरपाई त्यांनी दिली पाहिजे. ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यानंतर मंत्री पदे मिळाली. जय प्रकाश नारायण यांच्या आणीबाणी च्या आंदोलनात जे लोक कारावासात गेले त्यांनाच पक्षाने तिकिटे दिली. तसे राष्ट्रवादी करणार आहे काय..? शरद पवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा जे पी यांची चळवळ नाही. 

पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व संताप व्यक्त करतो!

Wednesday 16 November 2011

सामर्थ्य आहे चळवळीचे.....

उसाच्या भाव वाढीचे आंदोलन 

राजू शेट्टी यांनी बारामती हे मुख्य केंद्र करून सहकारी साखर कारखान्यांकडून उसाचे भाव वाढून मिळावेत यासाठी आंदोलन केले. याला माझा व युक्रांद चा पाठींबा होता. मी ११ नोव्हेंबर रोजी बरोबर दुपारी १२ वाजता बारामतीला पोहचलो. ज्या काही चार गोष्टी सांगाव्यात असे वाटत होत्या त्या राजू शेट्टी यांना सांगितल्या. तीन वाजता तिथून परत निघालो. संध्याकाळी सरकारने वाढीव दर जाहीर केले आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सर्व शेतकरी व त्यांचे नेते राजू शेट्टी यांचे अभिनंदन!

अण्णा हजारे व राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे जवळून निरीक्षण करताना व आकलन करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. चळवळ, जन आंदोलन, सत्याग्रही जन आंदोलन, राडेबाजी आंदोलन या सर्व गोष्टींच्या संकल्पना परस्परात मिसळून त्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत. विशेषता अण्णा हजारे, केजरीवाल, किरण बेदी यांच्या वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झालेल्या उक्तींमुळे आंदोलन, जन आंदोलन व सत्याग्रह या मूळ शब्दांचे अर्थ पार बदलून गेले आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीचे वेगळेपण काय ते तरुणांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

राजू शेट्टी यांचे आंदोलन हे एका विशिष्ट वर्गाचे आर्थिक आंदोलन होते; पण ते जन आंदोलन नव्हते. जन आंदोलनाचे हे विशेष असते कि त्यात समाजातील सर्व वर्ग, जाती व विविध धर्माचे अनुयायी सामील असतात, थोडक्यात जन आंदोलन बहुआयामी असते. ते राष्ट्र बांधणीला पुष्टी देणारे असते. हे आंदोलन शेतकरी वर्गाचे प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध वर्ग संघर्ष या स्वरूपातले होते. त्याचे युक्रांद स्वागत करते. 

त्याची कारणे पुढील प्रमाणे:
०१. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक होते. 
०२. राजू शेट्टी यांचे नेतृत्व 
०३. शेतकऱ्यांची एकजूट 

या आंदोलनाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. ग्रामीण भागात या विचार मंथनाची गरज आहे. ग्रामीण भागातून आलेले पुढारीच शेतकऱ्यांचे शोषण करतात, ते अधिक ठसठसीतपणे कळले त्यातच देशाचे हित सामावलेले आहे. प्रस्थापित नेते नव भांडवलशाहीचे दलाल असल्याने 'आपण शेतकऱ्यांची मुले आहोत' हेच ते विसरून जातात. त्यांना भांडवलदारांच्या दलालीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायला आवडते. भांडवलदारांना शेती नकोय, शेतकरी नको आहे. त्यांना फक्त जमीन दिसते. शेतकऱ्यांच्या मालाला जेन्वा योग्य भाव मिळतील तेन्वाच शेती टिकेल. जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी शेती करणार नाही, शेती टिकणार नाही, अन्नाकरिता भारत परावलम्बी होइल.

भावी काळात दोन राष्ट्रांच्या संघर्षात शाशत्रांच्या वापरा ऐवजी भुके मारण्याचे शास्त्र वापरले जाईल. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पडले आहे. परंतु देश जर स्वत: च्या जनतेसाठी पुरेसे अन्न तयार करू शकला नाही तर त्याला हे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. म्हणून जे जे शेती व शेतकरी यांना समृद्ध करील त्याला युक्रांचा पाठींबा राहील. 

राजू शेट्टी या नेत्याचा त्याग, साधेपणा व प्रामाणिकपणा पाहून त्याच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आले. राजू कुशल संघटक आहे. त्यामुळे तो त्याच्या क्षेत्रातून बाहेर पडला आणि शरद पवारांच्या गुहेत शिरून आह्वान दिले. ज्याला आपल्या क्षेत्रामध्ये सघन काम करता करता विस्तारित होता येते त्या नेत्याचा भविष्यकाळ उज्वल असतो. बारामतीत येवून ठिय्या मांडून बसण्याची त्याची खेळी राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी होती. राजूने उपवास केला नसते तरी चालले असते. त्याच्या उपवासाने आंदोलनाला विशेष धार आली असे म्हणता येणार नाही. गरज नसताना उपोषण करण्याचे कारण अण्णा हजारे यांचा परिणाम असे दिसते. परंतु हा प्रकार रुजला तर मराठीतील एक म्हण बदलावी लागेल. आज पर्यंत म्हटले जाई कि, 'सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे !' परंतु आता लोक म्हणतील कि. 'सामर्थ्य आहे उपवासाचे! जो जो उपाशी राहील तयाचे!'  सामुदाईक पुरुषार्थ नामक संकल्पनेला काजळी आणणारे हे सूत्र आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सारे काही व्यक्ती केंद्रित आहे. टीम - अण्णा हा शब्द केवळ भ्रम मूलक आहे. ज्या प्रमाणे कडू साखर अस्तित्वात नसते तशी काल टीम  अण्णा नव्हती - आज नसणार आणि उद्याही नसणार! अण्णा, अण्णा आहेत. अण्णांची टीम असा प्रकार अस्तित्वात असूच शकत नाही. अण्णा आता ५० लोकांची टीम करणार आहेत. त्या नंतर सारे काही बैजवार होणार असा प्रचार चालू आहे. हे पन्नास लोक कुठून येणार ? कोण निवडणार ? त्यासाठी अण्णांनी अर्ज मागविले आहेत. उद्या अण्णांकडून ज्ञान मिळाल्यामुळे भारतीय क्रांतीसाठी अर्ज मागविण्याचा विचार करीत आहोत. अडचण एकच आहे. रामलीला आंदोलनाला २५० कोटी खर्च आला असे म्हणतात तर क्रांतीसाठी आम्हाला निदान २५ हजार कोटींचा प्रायोजक मिळवावा लागेल. भांडवलदारांच्या मदतीने समाजवादी क्रांती करण्याचा मानस कसा पूर्ण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी युक्रांदची एक टीम राळेगणला रवाना झाली आहे. 

Monday 7 November 2011

देशको हिलाने वाला खुद न हिले !

अण्णा हजारे यांनी उभे केलेले आंदोलन सपशेल पराभूत व्हावे अशी काहींची इच्चा आहे. तसेच अण्णा हजारे यशस्वी होवोत वा अपयशी ठरोत, आगामी निवडणुकांमध्ये कोन्ग्रेस पक्ष पराभूत होऊन भाजप प्रणीत आघाधीचे सरकार केंद्रात यावे अशी तीव्र इच्छा असलेला एक वर्ग आहे. देशाची वैचारिक फाळणी झालेली आहे. या चर्चेत जन आंदोलन या कल्पनेपेक्षा अण्णा हजारे यांचे नेतृव, त्यांची क्षमता, बौद्धिक झेप, या गोष्टींना उगाचच प्राधान्य मिळाले आहे. सध्या देशासमोर खरा प्रश्न वेगळाच आहे. सर्व राजकीय पक्षांचा जन्म लोक्भावानेतून होतो. कोन्ग्रेस ने स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दीर्घकाळ अत्यंत दमदार पद्धतीने चालविला. स्वातंत्र्याच्या त्या चळवळी मधून लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि महात्मा गांधी अशी असंख्य गुणवान माणसे सार्वजनिक जीवनात आली. त्यांनी काही मुल्ये भारतीय जनमानसात रुजविली. प्रचलित परिस्थिती उलटी आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नव्याने भारती कशी होते, ते आपल्या पक्षाच्या उमेदवारी कोणाला देतात हे पहिले तर, सर्वच पक्षांना धनदांडगे लोक, गुन्हेगारी प्रवृतीचे लोक जवळचे वाटतात. नव्हे; एखादा गुन्हेगार आपल्या पक्षात यावा यासाठी चाधावोड चालते. सध्या सर्वात जास्त गुन्हेगारी मालमत्तेच्या खरेदी- विक्री व्यवहारात चालते. रियल एस्टेत हे या धंद्याचे नाव. एखादा मंत्री, खासदार- आमदार किंवा नगरसेवक जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत नसेल तर त्याचे नाव गिनीज बुकात घ्यावे लागेल. या परीस्थित परिवर्तन करण्याची शक्ती अण्णा हजारे प्रणीत आंदोलनात आहे काय ? हा खरा प्रश्न आहे.

अण्णा हजारे प्रणीत आंदोलन हे अस्सल जन आंदोलन होते कि ती जन आंदोलनाची आपल्या परीने केलेली नक्कल होती ? जन आंदोलनाचे भवितव्य ठरविताना काही वस्तू निष्ठ निकष आहेत. ते सर्व निकष थोड्या काळापुरते बाजूला ठेवूया. फक्त एकाच निकष लक्षात घेऊ .... जन आंदोलन हे राष्ट्र बांधणीचे मध्यम आहे यावर हे आंदोलन चालविणाऱ्या नेतृत्वाची ठाम श्रद्धा आहे का ..? हा निकष अत्यंत महत्वाचा आहे.

राष्ट्र उभारणीसाठी 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' याला पर्याय नाही. डावी कडे झुकलेला म्हणजे नाहीरे वर्गाविषयी संवेदनशील असलेला मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे 'आंदोलनामुळे राष्ट्रात कोणत्याही दोन गटात वैरभाव, द्वेष भावना वाढणार नाही याची काळजी घेणे. म्हणून आंदोलनाचे नेतृत्व करणारी टीम अण्णा किंवा स्वतः अण्णा यांच्यासाठी एकाच वस्तुनिष्ठ निकष आहे कि त्यांच्यामध्ये कोणाविषयी द्वेष, वैरभाव आहे का याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. एक नक्की आहे, टीम अण्णा मध्ये आपापसात स्नेह भाव, बंधुत्वाची भावना फुललेली दिसत नाही. परिस्थितीने त्यांना इतिहासाने एका विशिष्ठ ठिकाणी एकत्र आणून कोंडले असावे असे दिसते. अण्णा हजारे यांचा अहंकार फुग्याप्रमाणे सातत्याने फुगतोच आहे. याचे नेमके कारण काळात नाही. अहंकारामुळे हे घडू शकते, वा अज्ञानामुळे हे घडू शकते किंवा कुसंगतीने हि घडू शकते. अण्णांच्या व्यक्तीमत्वात जे गुण दोष आहेत. त्याचा शोध घेण्याचे एरवी काहीच कारण नाही पण ते ज्या उंचीवर पोहचले आहेत तेथे त्यांचे दोष मोठ्याप्रमाणावर वाढतील कि आत्म परीक्षणाच्या माध्यमातून अण्णा स्वत चे मन दोष मुक्त करू शकतील असा हा पेच आहे. पूर्वेतिहास पाहता अण्णांना सत्संगाचे वावडे असावे असा निष्कर्ष काढण्याइतका भक्कम पुरावा आहे. एखाद्याने संसार केला नाही म्हणजे केवळ त्याच निकषावर तो माणूस उत्तुंग व्यक्तिमत्वाचा व सद्गुणांचा पुतळा होतो काय ? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येकाने संसार करावा ही जनरीत आहे. कुटुंब सांभाळण्याच्या प्रयोगातून माणसाला अनेक गोष्टींचे भान येण्याची शक्यता असते. सर्वांना सांभाळून घ्यावे असा विचार कुटुंब प्रमुखामध्ये रुजतो. संसार न केलेल्या माणसाला संसार करणारी माणसे गौण दर्जाची वाटत असतील तर तो त्यांचे नेतृव्त कसे करू शकणार. डॉ. राम मनोहर लोहिया हे अहिंसक जन आंदोलनाचे कृतीशील विचारवंत होते. 'कोन्ग्रेस विरोध' त्यांच्या रोमारोमात भिनला होता. ढोंगाचा व ढोंगी माणसांचा ते सदैव तीव्र निषेध करीत. त्यांच्या प्रयत्नामुळे कोन्ग्रेस ने ९ राज्यात सत्ता गमावली. याच लोहियांनी आयुष्याच्या अखेरीस जय प्रकाश नारायण यांना एक पत्र लिहिले होते. "प्रिय साथी जय प्रकाश, मी देशाचा नेता बनू शकत नाही. हा देश बिगर संसारी व ब्रह्मचारी माणसाला कधीच आपला नेता मानणार नाही हे माझ्या लक्षात आले नाही. अलीकडे मलाही ते पटू लागले आहे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी न घेतल्याने मनात अनेक कंगोरे निर्माण होतात. म्हणून मित्र तूच या देशाचा नेता होऊ शकतोस. परिस्थिती गंभीर आहे, देशाला हलविणाऱ्या नेत्याची गरज आहे, आणि तो नेता तू आहेस. देश को तुम हि हिला सकते हो.. सिर्फ एक शर्त है.. लेकीन हिलाने वाला खुद नही हिले !" आज डॉ. लोहिया असते तर ते अण्णा हजारेंना म्हणाले असते कि 'अण्णा आपल्या भुमिके पासून सारखे बदलू नका. स्वत चे मन स्थिर असल्याशिवाय देशाला हलविण्याच्या भानगडीत पडू नका.