Wednesday 5 October 2011

महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...


महात्मा हि पदवी भारतीय इतिहासातील सर्वात मोठी पदवी आहे. ती सर्वात अधिक लोकमान्यतेचे प्रतिक आहे. २६०० वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धापुढे त्यांना महात्मा पदवी देण्याचा प्रस्ताव आला होता. त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. महात्मा म्हणवून घेण्यास नकार दिला. महात्मा हा जनतेने दिलेला जीवन गौरव पुरस्कार आहे. मुलभूत परिवर्तन करणाऱ्यासच फक्त महात्मा म्हणतात. प्रत्येक शब्दाच्या पोटात विशिष्ट अर्थ दडलेला असतो. उदा. संत म्हणजे मानवतावादी व सभ्य माणूस, महापुरुष म्हणजे समाजाच्या किमान एका स्तराला वर आणणारा माणूस, राष्ट्रसंत म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मानवतावादाचा प्रचार करणारा. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणत. सद्या भैय्यूजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणतात. परंतु महात्मा हि पदवी वा विशेषण मात्र फार थोड्या व्यक्तींसाठी राखीव आहे. महात्मा त्याला म्हणतात कि ज्याच्या कार्याच्या प्रारंभ पूर्वी असलेले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती त्याच्या जीवन कार्यामुळे पूर्णतः बदललेली असते. आपला देश जाती पातींनी, सवर्ण - दलित अशा भेदा भेदांमुळे चीर्फालालेला आहे,. म्हणून तर आपला आत्मा तुकड्या तुकड्यात विखुरलेला असतो, जो आत्म्याचे fracture दुरुस्त करतो - आत्म्याचे तुकडे जोडतो, सर्व तुकड्यांमध्ये स्वत प्रवेश करतो, सर्वांचा अंश बनतो अशा आत्म्याला महान आत्मा असे म्हणतात. महान आत्मा या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे महात्मा!


आत्ता पावेतो महात्मा गांधी व महात्मा फुले हे दोन महात्मे झाले. गौतम बुद्ध व महावीर यांना लोक भगवान म्हणू लागले. फुले यांनी स्त्रियांचा आत्मा जागविला. दलित सवर्णांची दरी कमी करून समाजाचे दोन तुकडे एकत्र जोडले. म्हणून त्यांना सत्यशोधक समाजाने महात्मा हि पदवी दिली. महात्मा गांधींनी जात, भाषा, धर्म व प्रांत यात विभागलेली, भारताच्या भूप्रदेशावर राहणारी जनता स्वतान्र्या संग्राम, सत्य - अहिंसा या तत्वाने एकत्र आणली आणि देशाचे राष्ट्रात व प्रजेचे नागरिकात रुपांतर केले. आत्मे जोडले म्हणून तो महान आत्मा.... महात्मा.


काहींना ब्रिटीश जायला नको होते, त्यांना येथेच श्रेणीबद्ध उच्चवर्णीयांचे राज्य हवे होते. ते ज्यांना दलित जाती समूह गुलामीतच राहायला हवे होते, ते ज्यांना स्त्रिया पुरुषांच्या गुलाम असाव्यात असे वाटत होते, ते ज्यांना एकाच धर्माचे राष्ट्र हवे होते अशांचा महात्मा गांधींना विरोध होता. महात्मा गांधी भारताला ज्या पद्धतीने आकार देत होते त्यामुळे त्यांच्या पारंपारिक हित संबंधाना धक्का लागणार होता. ते सर्व महात्मा गांधींचा द्वेष करीत होते, आजही करतात. ३० जानेवारी १९४७ रोजी त्यांनी गांधीजींची शारीरिक हत्या केली, पण या शक्ती गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत, किंबहुना गांधीजींचे विचार त्यांच्या समाधीतून बाहेर येत आहेत. त्यामुळे गांधीजी पुन पुन्हा समाधीतून बाहेर येतील याचा धसका अनेकांना वाटतो. कोन्ग्रेस पक्षाच्या नेत्यांना लाज वाटते म्हणून ते महात्मा गांधींच्या विचारांची हत्या व्हावी असे स्पष्ट म्हणत नाहीत. पण त्यांनी मालमत्तेच्या नादी लागून गांधींचे कधीच विस्मरण केले आहे, 


या परिस्थितीत गांधी फक्त सामान्य भारतीय जनतेला हवे आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाला नको आहेत. सत्य - अहिंसा - निर्वैरता या मुल्ल्यांचे सर्व राजकीय पक्षांनी निर्माल्य बनविले आहे. गांधीजी शरीराने अस्तीवतात नसल्याने आता परत त्यांचा खून करणार तरी कसा. म्हणून त्यांचे व त्यांच्या विचारांचे थिल्लरीकरण करण्याचा डाव आखण्यात आला आहे. या थिल्लरीकरण विरुद्ध गांधीजींच्या विचारांची श्रेष्ठता हि लढाई चालू आहे. या लढाईत आण्णा हजारेंना साधन केले जात आहे. पूर्वी किल्ल्याच्या दरवाज्याचे संरक्षण करण्यासाठी खिळे लावले जात. तो तोडण्यासाठी हत्ती त्याला धडाका मारत. हत्तींना जखमा होऊ नयेत म्हणून मध्ये उंटांना उभे करीत. तसाच आण्णांचा वापर केला जात आहे याचे मला दुख होत आहे. मनाला क्लेश होतात. 


७३ व्या घटना दुरुस्ती नंतर ग्रामसभेला खूप अधिकार मिळाले. परंतु त्या अधिकाराची मर्यादा त्या गावाच्या शिवे पर्यंत असते. एका गावाने केलेला ठराव दुसर्या गावाला लागू होत नाही. २ ऑक्टोबर रोजी राळेगण येथे अन्ना हजारेंना महात्मा म्हणावे असा ठराव पास केला. माझ्यासारख्या अनेकांना असे वाटत होते कि आण्णा अखिल भारतीय पातळीवरील व्यक्तिमत्व आहे. परंतु आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आण्णांना फक्त गावापुरते महत्व आहे. आत्ता महाराष्ट्रात लाट येईल. ४४००० गावात स्थानिक महात्मे निर्माण होतील. गावागावात ज्वारीचे पिक येणार नाही पण महात्म्याचे पिक जोरात येईल. बारामती, अकलूज, लातूर इत्यादी गावांमध्ये महात्मा हि पदवी कोणाला मिळणार याचा अंदाज आम्हाला येतो. कारन आधीपासूनच तेथे महान माणसे आहेत. गांधीजींना त्यांच्या आश्रम वासियांनी विचारले कि बापुजी आम्ही तुम्हास महात्माजी म्हणणार आहोत. चंपारण्य च्या लढ्यापासून जनता तुम्हाला महात्मा म्हणतेच, मग आम्हाला हि संधी का नाही. तेंवा गांधीजीनी जे उत्तर दिले ते सर्व भारत वासियांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले " माणूस हा भगवान आही सैतान अशा दोन्ही प्रवृत्तीचे मिश्रण आहे, त्यामुळे आयुष्यभर देवासारखे वागला आणि अखेरच्या काळात अध पतित झाला असे घडू शकते. म्हणून केवळ मृतुच ठरवू शकतो कि तो महात्मा आहे किंवा नाही? मी मेल्याशिवाय माझा जय जय कर करायचा कि नाही याचा निर्णय घेऊ नये." त्यावर आश्रम वासीय म्हणाले, " बापुजी, तुम्ही नवे राष्ट्र जन्माला घालणार राष्ट्रपिता आहात म्हणून आम्ही तुम्हाला महात्मा म्हणू इच्छितो." त्यावर बापुजी म्हणाले, " राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया हि दीर्घकाळ चालणारी आहे. हिंदू - मुस्लीम ऐक्य हा भारत नावाच्या आधुनिक राष्ट्राचा गाभा आहे. म्हणून मी जर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी "हे राम - हे रहीम" असे उद्गार काढू शकलो तर माझ्या मृतू नंतर मला महात्मा म्हणणे संयुक्तिक ठरेल. 


नथुराम गोडसेने निशस्त्र अश्या ७९ वर्षाच्या वृद्ध व्यक्ती वर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी छातीत घुसली त्यावेळी गांधींच्या तोंडून " हे राम ..." हे उद्गार निघाले. नंतर नथुराम ने दुसरी गोळी घातली. त्यावेळी गांधीजींचा आवाज क्षीण झाला होता.. ते खाली कोसळले होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून शब्द आहे " हे रहीम.." म्हणून ते पूर्ण महात्मा ठरले. महात्मा या शब्दाचे अवमूल्यन व थिल्लरीकरण होऊ नये एवढीच अपेक्षा...!

No comments:

Post a Comment